शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लखनऊमध्ये 13 वर्षाच्या मुलाची गळफास लावून आत्महत्या; ब्लू व्हेल गेममुळे आत्महत्या केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 16:06 IST

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमने गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ घातला आहे.

ठळक मुद्दे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमने गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ घातला आहे. खेळाने उत्तर प्रदेशातील एकाचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका १३ वर्षांच्या एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

लखनऊ, दि.8- आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमने गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ घातला आहे. या खेळाने उत्तर प्रदेशातील एकाचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका १३ वर्षांच्या एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या ब्लू व्हेल या गेममुळे केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आदित्य वर्धन असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. हा मुलगा लखनऊ येथील इंदिरा नगर भागात असलेल्या आदित्य निर्मला इंग्रजी शाळेत शिकत होता. आदित्य गेल्या दोन आठवड्यापासून ब्लू व्हेल गेम खेळत होता आणि तो काहीसा ताणातही होता, असं आदित्यच्या मित्रांनी सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलं.

उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या आठवडयात सर्व जिल्ह्यांच्या पोलिस मुख्यालयांना ब्लू व्हेल खेळावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. आदित्य हा अभ्यासात फारसा हुशार नव्हता. आदित्य बऱ्याचदा त्याच्या आईच्या मोबाइलवरच गेम खेळत असायचा अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. ‘ब्लू व्हेल’ या गेममुळेच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने आदित्यच्या आत्महत्येसंदर्भातील बातमी दिली आहे.

३ सप्टेंबर रोजी सात्विक पांडे या मुलाने ट्रेन खाली उडी मारून ब्लू व्हेल गेम मुळे आपले आयुष्य संपविल्याचा अंदाज व्यक्त होत होता. पाच दिवसातच ब्लू व्हेल गेममुळे दुसरी आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. तसंच मुंबईत मनप्रीत नावाच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर देशभरात या गेममुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या घटना वाढत गेल्या. 

ब्लू व्हेलच्या नादात आत्महत्या करण्यापासून वाचवलेल्या जोधपूरमधील मुलीचा पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्नब्लू व्हेल गेमच्या नादात  जोधपूरमधील मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे गेमच्या नादात पहिल्या वेळी आत्महत्या करण्यापासून त्या मुलीला वाचविण्यात आलं होतं. पण या मुलीने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न प्रयत्न केला.  झोपेच्या गोळ्या खाऊन दहावीत शिकणाऱ्या या मुलीने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ब्लू व्हेल गेमच्या शेवटच्या टास्कपर्यंत पोहचल्याने तिने सोमवारी रात्री पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मुलीने आधी तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता .पण त्यावेळी पोलिसांनी आणि काही लोकांनी तिला तलावाबाहेर खेचून वाचवलं. पण त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा तिने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेल